esakal | Loksabha 2019 : मतदानाला जाताना अशी काळजी घ्या...
sakal

बोलून बातमी शोधा

Voting

काय करावे
१. रांगेत उभे राहा आणि आपला नंबर येईपर्यंत वाट पाहा.
२. मतदान केंद्रामध्ये आणि आसपास शांतता राखा.
३. निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले छायाचित्र ओळखपत्र दाखवा.
४. मतदान कसे करावे, या सूचनांचे पालन करावे.
५. मतदान पथकासोबत सौजन्याने वागा.
६. मतदान केल्यानंतर शांततेत केंद्राबाहेर पडावे.

Loksabha 2019 : मतदानाला जाताना अशी काळजी घ्या...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या (ता. २३) होणार आहे. या वेळी मतदानाला जाताना अशी काळजी घ्या...

हे लक्षात ठेवा -
ओळख पटविण्यासाठी मान्यताप्राप्त कागदपत्रे

 • मतदार छायाचित्र ओळखपत्र
 • पारपत्र (पासपोर्ट)
 • वाहन परवाना
 • पॅनकार्ड
 • केंद्र, राज्य किंवा सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक पब्लिक सेक्‍टर कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी यांच्याद्वारे जारी केलेले छायाचित्र
 • बॅंक, टपाल कार्यालयाद्वारे जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक

मतदान कसे करावे -
आपले नाव मतदार यादीत असणे अनिवार्य आहे. 

 • मतदान अधिकारी चिन्हांकित यादी आणि ओळखपत्रसंबंधित कागदपत्रे यांची जुळवणी करेल.
 • तुमची ओळख पटल्यानंतर दुसरा मतदान अधिकारी पक्‍की शाई तुमच्या डाव्या हाताच्या तर्जनीला लावेल.
 • मतदार चिठ्ठीवरील क्रमांकाच्या आधारे मतदान अधिकारी मतदान करण्यास मान्यता देईल.
 • आपल्या निवडीच्या उमेदवाराच्या नावापुढील निळे बटन दाबा. छोटे बटण लाल चमकेल किंवा बीपचा लांब आवाज होईल. जे की आपले मतदान सफल झाल्याची खात्री करेल.
 • व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून तुम्ही दिलेल्या उमेदवारास मत नोंदविल्याबाबत खात्री करून घ्या.

काय करावे
१. रांगेत उभे राहा आणि आपला नंबर येईपर्यंत वाट पाहा.
२. मतदान केंद्रामध्ये आणि आसपास शांतता राखा.
३. निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले छायाचित्र ओळखपत्र दाखवा.
४. मतदान कसे करावे, या सूचनांचे पालन करावे.
५. मतदान पथकासोबत सौजन्याने वागा.
६. मतदान केल्यानंतर शांततेत केंद्राबाहेर पडावे.

काय करू नये
१. मतदान करण्यासाठी लाच घेणे गुन्हा आहे. 
२. तोतयागिरी करणे गुन्हा आहे.
३. मतदान प्रक्रियेत अडथळा आणू नये, तुरुंगवास होऊ शकतो.
४. ईव्हीएम, व्हीव्हीपॅटसहित मतदान साहित्याला हानी पोचवू नका.
५. मतदान केंद्राच्या परिसरात थुंकणे, घाण पसरवणे गुन्हा आहे.

मतदान केंद्र आणि मतदार यादीत नाव शोधण्यासाठी

 • प्ले स्टोअरवर जाऊन Voter Helpline हे ॲप डाउनलोड करा.
 • किंवा पुढील संकेतस्थळावर जाऊन मतदार यादीत नाव शोधता येईल.
 • www.nvsp.in
 • www.ceo.maharashtra.gov.in

मोबाईल मनाई
धूम्रपानास मनाई
छायाचित्र घेण्यास मनाई
शस्त्र मनाई
हेल्पलाईन १९५०

loading image