Loksabha 2019 : रामदास आठवलेंच्या 'त्या' वाक्यांमुळे पिकला हशा...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

नाशिक : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या काव्यात्मक वाक्यांमुळे पिंपळगाव (दिंडोरी) येथे आज (सोमवार) नागरिकांमध्ये चांगलाच हशा पिकाला. आठवलेंच्या प्रत्येक वाक्यागणीक नागरिक उत्फुर्त प्रतिसाद देत टाळ्या वाजवत होते.

नाशिक : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या काव्यात्मक वाक्यांमुळे पिंपळगाव (दिंडोरी) येथे आज (सोमवार) नागरिकांमध्ये चांगलाच हशा पिकाला. आठवलेंच्या प्रत्येक वाक्यागणीक नागरिक उत्फुर्त प्रतिसाद देत टाळ्या वाजवत होते.

पिंपळगाव (बसवंत) येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. पंतप्रधान व्यासपीठावर येण्यापूर्वी नेत्यांची भाषणे झाली. आठवले भाषणासाठी उभे राहिले अन् हास्याची कारंजे फुटू लागली. आठवले यांच्या कवितांनी नेहमीच हास्याची कारंजे फुठतात. मात्र, नेहमी वेगळ्या धाटणीचे भाषण देण्यात पटाईत असलेले आठवले यांनी यावेळीही मोदींची स्तुती केली. स्तृती करत असताना काही घोषणाही दिल्या. मात्र, काव्यात्मक वाक्य करत असताना उपस्थित मात्र आनंद लुटताना दिसत होते.

भाषणादरम्यान आठवले म्हणाले,
नरेंद्र मोदी चौकीदार, राहुल गांधी भागीदार;
नरेंद्र मोदी विकासपुरुष, राहुल गांधी भकासपुरुष;
नरेंद्र मोदी फकीर हैं, राहुल गांधी अमीरो की लकीर हैं;
आमच्याकडे काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची आहे जंत्री,
म्हणून मोदी होणार पुन्हा प्रधानमंत्री...

असे म्हणत त्यांनी नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. आठवलेंच्या प्रत्येक वाक्यानंतर उपस्थित टाळ्या वाजवून दाद देताना दिसत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramdas Athavale s unique slogans and Laughing in Narendra Modis rally at Nashik