Loksabha Results : बीडमधून भाजपच्या प्रीतम मुंडेंचा एक लाख 77 हजार मतांनी विजय

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 मे 2019

राज्यात चर्चेची आणि भाजप व राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघात खा. प्रितम मुंडे यांचा एक लाख 77 हजार मतांनी विजय झाला आहे.

लोकसभा निकाल 2019 
बीड : राज्यात चर्चेची आणि भाजप व राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघात खा. प्रितम मुंडे यांनी सुरवातीपासूनच आघाडी घेतली होती. सुरवातीपासूनच राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे पिछाडीवर होते.

बीड मतदारसंघात भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे या विजयी झाल्या असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनवणे यांचा एक लाख 77 हजार मतांनी पराभव केला आहे. दुसऱ्या क्रमांकाची मते या निवडणुकीत बजरंग सोनवणे यांना मिळाली आहेत. तर, वंचित बहुजन आघाडीचे विष्णू जाधव हे तिसऱ्या स्थानी राहिले.

दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे गणित सुरवातीपासूनच बिघडताना दिसून आले. जातीय समिकरणे डॉ. प्रितम मुंडे यांच्या पथ्यावर पडली असल्याचे स्पष्ट दिसत आहेत. भाजपच्या विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांनीच बीड लोकसभा मतदारसंघात बाजी मारली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Close fight between Pritam munde and Bajrang Sonwane in Beed constituency for Lok Sabha 2019 Election Results