Election Results : लातुरमध्ये भाजपचे सुधाकर श्रंगारे विजयी !

वृत्तसंस्था
Thursday, 23 May 2019

लातूर अनुसूचित जाती लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार 
हे आज कळणार आहे. भारतीय जनता पक्षाचे सुधाकर शृंगारे यांच्या रुपाने 
पुन्हा एकदा या मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकणार की काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत `कमळा`ला `हात` दाखवत काँग्रेसचा गढ काबीज करणार हे आज स्पष्ट होणार आहे.

लातूर : लातूर अनुसूचित जाती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या सुधाकर शृंगारे यांनी बाजी मारली असून त्यांनी काँग्रेसच्या मच्छिंद्र कामंत यांच्यावर विजय मिळवला आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच भाजपच्या सुधाकर श्रंगारे यांनी आघाडी घेतली होती. ती आघाडी शेवटपर्यंत कमी झाली नाही. लातूर मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकाची मचे वंचित बहुजन आघाडीच्या रामराव गारकर यांना मिळाली आहेत.

अधिकृत वृत्तानुसार भाजपच्या सुधाकर श्रंगारे यांना 641194 तर, काँग्रेसच्या मच्छिंद्र कामत यांना 357056 एवढी मते मिळाली आहेत. तर, वंचित बहुजन आघाडीच्या रामराव गारकर यांना 108866 एवढी मते मिळाली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Close fight between Sudhakar Shrungare and machindra kamat in latur constituency for Lok Sabha 2019