LokSabha2019 : काँग्रेसला देशात दोन पंतप्रधान पाहिजेत : नरेंद्र मोदी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

नांदेड : काँग्रेसला देशात दोन पंतप्रधान हवे आहेत. एक दिल्लीत आणि दुसरा जम्मू-काश्मिर मध्ये. 'आप्सा' कायदा रद्द करून देशातील जवांनांच्या जिवावर उठली आहेत. काँग्रेस पाकिस्तानकडून पैसे घेणाऱ्या अलिप्तवाद्यांची मदत घेत आहेत. भारताचे तुकडे करु पाहणाऱ्या लोकांची साथ देण्यासाठी सरसावली आहे. नांदेडकरांना हे मान्य आहे का. देशाचे तुकडे करु पाहणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी आप्सा सारखा कायदा हटविण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहेत. अशी टिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. नांदेड मध्ये सुरु असलेल्या भाजपच्या प्रचार सभेत मोदी बोलत होते.

यांनी सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. एअर स्ट्राईकचे पुरावे मागीतले होते. देशातील दहशतवाद, नक्षलवाद ही सगळी काँग्रेसने लावलेली आग आहे. काँग्रेस आणि त्यांना पाठींबा देणारे 21 पक्ष यामध्ये सहभागी आहे. देशात काँग्रेसनेच दहशतवाद पोसला आहे. बोफोर्स, हेलिकॉप्टर सारख्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर दलाली घोटाळा झाला आहे. हेलिकॉप्टरची दलाली कोणी खाल्ली. एक मुलगा, एक आई आणि एक मामा यांनीच यातले पैसे खाल्ले आहेत. 

2014 मध्ये तुमच्या एका मतदानामुळे त्यांना बाहेर काढले होते. काँग्रेसचे कारनामे पिढ्यान पिढ्या भ्रष्ट्राचारीच राहिल्या आहेत. मागील वेळी काँग्रेस 44 सिट पर्यंत पोहजली होती यावेळी त्यात आणखी घट येणार आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Wants to Two PM in Country says Narendra Modi