Loksabha 2019 : 'घराणेशाहीचा तिकटारा आल्यानेच वंचित बहुजन आघाडीला पाठींबा'

Due to Hereditary Politics I am supporting the Vanchit Bahujan alliance says Ram Garkar
Due to Hereditary Politics I am supporting the Vanchit Bahujan alliance says Ram Garkar

लोकसभा 2019
लातूर : लोकांना राजकारणातील घराणेशाहीचा प्रचंड तिटकारा आला आहे. यामुळेच लोकांचा वंचित बहुजन आघाडीला प्रचंड पाठिंबा मिळत असून लातूरसह राज्यभरात आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील, असा विश्वास लातूर लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार राम गारकर व पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. 15) पत्रकार परिषदेत दिली. 

आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद भातांब्रे, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी, प्रा. युवराज धसवाडीकर, अफजल कुरेशी, संजय कुरेवाड, अॅड. मंचकराव डोणे, डॉ. सुरेश वाघमारे, बसवंत भरडे, अॅड. माधव कोळगावे या वेळी उपस्थित होते. श्री. गारकर म्हणाले, 'अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभांमुळे आघाडीची भूमिका लोकांना पटली असून आघाडीने काँग्रेस व भाजपला समर्थ आणि भक्कम पर्याय दिला आहे. समाजातील सर्वच घटक आघाडीला पाठिंबा देत असून समाजातील विविध संघटनाही विनाअट पाठिंबा देत आहेत.' 

डॉ. भातांब्रे म्हणाले, 'भाजप व काँग्रेसचे उमेदवार हे मोठ्या राजकीय घराण्यांनीच पुढे केलेले असून उमेदवारांआडून घराणेशाही जोपासली जात आहे. दोन्ही पक्षांनी पैसा या प्रमुख निकषावरच उमेदवारांची निवड केली असून आघाडीचे उमेदवार उच्चशिक्षित असल्याने ते नक्की विजयी होतील.' श्री. सूर्यवंशी म्हणाले, 'काँग्रेस व भाजपचे उमेदवार आयात केलेले असून वर्षानुवर्ष दोन्ही पक्षांकडून सुरू असलेल्या नात्यागोत्याचा राजकारणाचा लोकांना वीट आला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रस्थापितांचे भाजपातील प्रवेश पाहता दोन्ही पक्ष एकमेकांच्या 'बी' टीम असल्याचे लोकांना आता पटले आहे.' 

मुस्लिम समाज आघाडीच्या उमेदवाराच्या मागे भक्कमपणे असून त्यांच्या विजयासाठी शेवटपर्यंत काम करणार असल्याचे श्री. कुरेशी यांनी स्पष्ट केले. भाजपने आरक्षणाला बगल दिल्यानेच धनगर समाज आघाडीच्या मागे गेल्याची भावना अॅड. कोळगावे यांनी व्यक्त केली.

चाळीस लाखाची मदत :
लोकांचा पैसा अन् लोकांचे काम, या भूमिकेतून वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत पाऊल ठेवले आहे. लोकांकडून मोठी आर्थिक मदत आघाडीला मिळत आहे. एका कुटुंबांने मुलीच्या लग्नासाठी ठेवलेली दहा लाखाची रक्कम आघाडीला दिली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समित्यांकडून जमा केलेल्या वर्गणीपैकी निम्मी रक्कम आघाडीच्या बॅंक खात्यावर जमा केली जात आहे. लातूर जिल्ह्यातून आतापर्यंत चाळीस लाखाची मदत मिळाल्याचे श्री. सूर्यवंशी यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com