Loksabha 2019 : जालना, औरंगाबादेची जागा युतीच जिंकणार - हरिभाऊ बागडे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मे 2019

हरिबाऊ बागडे म्हणाले, 'राज्यातील लोकसभा मतदारसंघात काय परिस्थिती असेल, राज्याचे मला माहित नाही, पण औरंगाबाद, जालन्याची जागा युती नक्की जिंकेल.'

लोकसभा 2019
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे मला सांगता येणार नाही. परंतू औरंगाबाद आणि जालना लोकसभेची जागा युती जिंकणार आहे, असा विश्‍वास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी (ता. 13) पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला. 

कृषी उत्पन्न बाजार समितीत हापूस आंबा महोत्सवास हरिभाऊ बागडे यांनी भेट दिली. लोकसभा निवडणुकीच्या निकालाजी तारीख जशी जवळत येत आहे. तसेच आपल्या मतदारसंघातून कोण बाजी मारले यांच अंदाज बांधणी करण्यात येत आहे. औरंगाबाद लोसभेची चौरंगी लढत झाली, तसेच जालना लोकसभेची लढच जोरदार झाल्याची चर्चा आहे. यामुळे औरंगाबाद आणि जालना या मराठवाड्यातील दोन लोकसभा मतदारसंघावर सध्या संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

जालना मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि औरंगाबादेतून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पाचव्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आमदार असलेला फुलंब्री मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात येतो. 

बागडे म्हणाले, 'राज्यातील लोकसभा मतदारसंघात काय परिस्थिती असेल, राज्याचे मला माहित नाही, पण औरंगाबाद, जालन्याची जागा युती नक्की जिंकेल,' असे एक नव्हे दोन वेळा उल्लेख ही श्री. बागडे यांनी केला. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीचा धर्म न पाळता जावयाला मदत केली, या शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या आरोपवर "खासदार खैरे काही जरी म्हणाले तरी ते फार मनावर घ्यायचे नसतं, ते प्रेमाने बोलत असतात. उलट नंतर ते ज्यांच्या विरोधात बोलले त्यांच्याशी चांगली दोस्ती करतात. ते काहीही म्हणाले तरी युतीचे नेते आहेत. ते जे काही बोलतात ते आम्ही समजून घेतो. आम्ही बोललेलो ते समजून घेतात आणि अशा समजुतीतूनच युती पुढे जात असते असेही बागडे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna Aurangabad will win alliance says Haribhau Bagade