Jalna Loksabha 2019 : दुपारी चारपर्यंत 49.40 टक्के मतदान

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 23 April 2019

जालना लोकसभा मतदारसंघात दुपारी दोनपर्यंत एकूण 49.40 टक्के मतदान झाले आहे. जालना मतदारसंघात भाजपचे प्रेदशाध्यक्ष विद्यमान खासदार रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांच्यात थेट लढत आहे.

जालना: जालना लोकसभा मतदारसंघात दुपारी दोनपर्यंत एकूण 49.40 टक्के मतदान झाले आहे. जालना मतदारसंघात भाजपचे प्रेदशाध्यक्ष विद्यमान खासदार रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांच्यात थेट लढत आहे.

आज दुपारपर्यंत जालना लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी बदनापूर विधानसभा मतदारसंघात 51.88 टक्के, भोकरदन विधानसभा मतदारसंघात 53.14 टक्के, जालना विधानसभा मतदारसंघात 41.56 टक्के, पैठण विधानसभा मतदारसंघात 51.80 टक्के, फुलंब्री विधानसभा मतदारसंघात 50.41 टक्के तर सिल्लोड विधानसभा मतदारसंघात 48.33 टक्के मतदान झाले आहे.

दरम्यान, जालना लोकसभा मतदार संघात 18 लाख 65 हजार 46 मतदार मतदानाचा  हक्क बजावणार  आहेत. जालना शहरात 227 मतदान केंद्र आहेत. तसेच लोकसभा मतदार संघात शहरी भागात 480 तर ग्रामीण भागात एक हजार 578 असे दोन हजार 58 मतदार केंद्रावर सोमवारी (ता.23) सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरवात झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna witnesses high percent voting for Loksabha 2019