Loksabha 2019 : मतदानाच्या जनजागृतीसाठी ज्युनिअर चार्ली रस्त्यावर

प्रकाश बनकर
शनिवार, 20 एप्रिल 2019

चार्ली-चॉप्लिीनची खास शैली औरंगाबादकरांना आपल्या अभिनयातून दाखविणारा चार्ली वेगवेगळ्या सभा-समारंभ मध्येही हजेरी लावत आपला हक्‍क बजवा असे आवाहन करीत आहेत.

औरंगाबाद : लोकशाहीसाठी महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या मतदान प्रक्रीयेत सर्वांनी पुढाकार घेत आपला हक्‍क बजावावा. यासाठी शहरातील ज्युनिअर चार्ली-चॅप्लिन जनजागृती करीत आहे. 1 एप्रिलापासून शहरातील विविध ठिकाणी फिरून चार्ली उर्फ सोमनाथ स्वाभावणे हे काम करीत आहे. 

चार्ली-चॉप्लिीनची खास शैली औरंगाबादकरांना आपल्या अभिनयातून दाखविणारा चार्ली वेगवेगळ्या सभा-समारंभ मध्येही हजेरी लावत आपला हक्‍क बजवा असे आवाहन करीत आहेत.

मतदान करा मतदानाच्या दिवशी गावाला जाऊन नका, झोपून राहू नका, योग्य उमेदवार मत द्या अशी जगनजागृती करत असून, जनजगृती करत असताना नागरिक चार्ली सोबत स्लेफी काढून मतदान करणार असल्याचे अश्वासन देत आहेत. 
चार्ली चॅप्लिन शहरात होणाऱ्या सर्वच पक्षांच्या जाहीर सभांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी मतदान जागृती करताना दिसतो. चार्लीच्या विविध कलांच्या साह्याने नागरिकांना हसवत तो मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना करतोय. कधी आपल्या अनोख्या सायकलवर स्वर होऊन तर कधी नागरीकांसोबत नृत्य करत तो मतदान करा असे आपल्या मूक अभिनयातून सर्वाना सांगतोय.

जुनियर चार्ली म्हणजेच सोमनाथ स्वभावानेवर चार्लीच्या जीवनाचा खूप प्रभाव आहे. त्याच्या जीवनातील अनेक गोष्टींमुळे सोमनाथ प्रभावित आहे. त्यामुळे त्याच्यासारखे जगायचे आणि हसवत रहायचे हा त्याचा छंद झाला आहे. चार्लीच्या वेशात आल्यावर सोमनाथ पूर्णतः त्याच्यासारखा वागू लागतो. जो पर्यंत चार्लीच्या भूमिकेत आहे तो पर्यंत तो कोणासोबत बोलत नाही. गेल्या पंधरा वर्षांपासून चालरीच्या भूमीत जगणारा जुनियर चार्ली आता लोकांमध्ये जनजागृती करतोय. त्याच्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Junior charlie chaplin on the street for awareness of voting