North Central Mumbai Loksabha 2019 : प्रिया दत्त की पूनम महाजन?; 54.05 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 April 2019

2014 च्या लोकसभा निवडणुकीत प्रिया दत्त यांचाच पराभव करून पूनम महाजन खासदार झाल्या होत्या. आता या दोघींमध्येच लढत आहे. यंदा प्रिया दत्त यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. पण, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्या लढण्यास तयार झाल्या.

मुंबई : प्रमोद महाजन यांचा वारसा असलेल्या पूनम महाजन आणि सुनील दत्त यांची कन्या प्रिया दत्त यांच्यात उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात चुरस पाहायला मिळणार आहे. उच्चभ्रू वस्तीचा भाग असलेल्या या मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे असेल. रात्री आठपर्यंत 54.05 मतदानाची नोंद झाली आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत प्रिया दत्त यांचाच पराभव करून पूनम महाजन खासदार झाल्या होत्या. आता या दोघींमध्येच लढत आहे. यंदा प्रिया दत्त यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. पण, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्या लढण्यास तयार झाल्या. प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी संजय दत्त यांनीही रोड शो घेतला होता. पूनम महाजन यांना राजकीय वारसा मिळाल्याने त्यांनीही जोरदार प्रचार केला आहे.

उत्तर मध्य मुंबईतील विले पार्ले : 59.92, चांदिवली : 59.92, कुर्ला : 51.31, कलिना : 49.70, वांद्रे पूर्व : 51.02, वांद्रे पश्चिम : 50.01 या विधानसभा मतदारसंघांमध्ये पुढीलप्रमाणे मतदानाची नोंद झाली आहे. 

मतदानाची अंतिम आकडेवारी अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress candidate Priya Dutt and BJP candidate Poonam Mahajan contest in North central Mumbai