North Mumbai Loksabha 2019 : उर्मिलाचे शेट्टींपुढे थेट आव्हान; 57.27 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 एप्रिल 2019

विद्यमान खासदार आणि राजकीय वजन असलेल्या गोपाळ शेट्टींविरोधात काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता होती. काँग्रेसने या मतदारसंघातून अभिनेत्री उर्मिलाला तिकीट देत ही निवडणूक चुरशीची बनविली.

मुंबई : मुंबईतील सर्वांत जास्त लक्षवेधी लढत असलेल्या उत्तर मुंबईत आज (सोमवार) सकाळपासून मतदानासाठी नागरिकांची गर्दी आहे. काँग्रेसकडून उर्मिला मातोंडकर आणि भाजपकडून गोपाळ शेट्टी यांच्यात येथे थेट लढत आहे. सायंकाळी सातपर्यंत 57.27 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

विद्यमान खासदार आणि राजकीय वजन असलेल्या गोपाळ शेट्टींविरोधात काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता होती. काँग्रेसने या मतदारसंघातून अभिनेत्री उर्मिलाला तिकीट देत ही निवडणूक चुरशीची बनविली. गेल्या महिनाभरापासून उर्मिलाकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. शेट्टींचाही मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे ही लढत राज्यात लक्षवेधी बनली आहे.

उत्तर मुंबईतील बोरिवली मतदारसंघात सर्वांत जास्त मतदान झाल्याचे दिसत आहे. उत्तर मुंबईतील बोरीवली : 62.15, दहिसर : 61.20, मागाठणे : 56.00, कांदिवली पूर्व : 52.53, चारकोप : 58.93, मालाड पश्चिम : 52.85 या विधानसभा मतदारसंघांमध्ये पुढीलप्रमाणे मतदानाची नोंद झाली आहे. 

मतदानाची अंतिम आकडेवारी अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress candidate Urmila Matondkar and BJP candidate Gopal Shetty contest in North Mumbai Loksabha