Election Results : उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसला धक्का; प्रिया दत्त यांचा पराभव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

- भाजपच्या पूनम महाजन यांनी केला प्रिया दत्त यांचा पराभव.

लोकसभा निकाल 2019 : उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन यांचा विजय झाला असून, काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांचा पराभव झाला आहे. 

भाजपच्या पूनम महाजन यांना 481572 मते मिळाली असून, प्रिया दत्त यांना 353803 मते मिळाली आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे अब्दुर रेहमान अंजारिया यांना 32362 मत मिळाली आहेत. 

भाजपच्या राष्ट्रीय युवा मोर्चाची राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या पूनम यांच्यापुढे दोनवेळा खासदार राहिलेल्या प्रिया दत्त यांचे कडवे आव्हान होते. मात्र, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत प्रिया दत्त यांचाच पराभव करून पूनम महाजन खासदार झाल्या होत्या.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Priya Dutt Defeated in North Central Mumbai Loksabha Constituency for Lok Sabha 2019