Loksabha 2019 : माझाही दाभोलकर करतील: उर्मिला मातोंडकर (व्हिडिओ)

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 एप्रिल 2019

हे लोक भ्याड आहेत, हे माझाही दोभोलकर करतील अशी भीती उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केली. उर्मिला यांनी उमेदवारांना अश्लील टिप्पणीला सामोरे जावे लागत असल्याचेही म्हटले आहे.

मुंबई : हे लोक भ्याड आहेत, हे माझाही दोभोलकर करतील अशी भीती उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केली. उर्मिला यांनी उमेदवारांना अश्लील टिप्पणीला सामोरे जावे लागत असल्याचेही म्हटले आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिस संरक्षणाचीही मागणी केली आहे. या हुल्लडबाजीत एक महिला प्रवासी पडल्याने जखमी झाली आहे. तर या कार्यकर्त्यांना काँग्रेसने चोप दिला आहे. बोरिवलीमध्ये आज (ता.15) सोमवारी हा प्रकार घडला. बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर या प्रचार करत होत्या. यावेळी भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. 

'मोदी मोदी'च्या घोषणाही यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. यानंतर तेथील काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली. काँग्रेस कार्यकर्त्यांनीही चौकीदार चोर है च्या घोषणा दिल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I Will be killed like dabholkar Says Urmila matondkar