Loksabha 2019 : प्रकाश आंबेडकर, आठवलेंची भूमिका हास्यास्पद - मुणगेकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

मुणगेकर म्हणाले, की यंदाची लोकसभा निवडणूक ही आतापर्यंत झालेल्या निवडणुकीपेक्षा वेगळी असून, देशातील सर्व पक्ष एका बाजूला आणि नरेंद्र मोदी एका बाजूला अशी परिस्थिती आहे. या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रात ४८ पैकी ४८ जागी उमेदवार उभे केलेले आहेत.

मुंबई - रिपाइंचे रामदास आठवले आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची राजकीय भूमिका हास्यास्पद असल्याची टीका काँग्रेसचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी केली.

मुणगेकर म्हणाले, की यंदाची लोकसभा निवडणूक ही आतापर्यंत झालेल्या निवडणुकीपेक्षा वेगळी असून, देशातील सर्व पक्ष एका बाजूला आणि नरेंद्र मोदी एका बाजूला अशी परिस्थिती आहे. या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रात ४८ पैकी ४८ जागी उमेदवार उभे केलेले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचा पराभव व्हावा किंवा या आघाडीचे मते कमी व्हावीत, यासाठी वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार उभे केले आहेत. 

प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेसने सातत्याने प्रयत्न केला; परंतु त्यांना आघाडी करायचीच नव्हती, त्यांची भूमिका कायम संशयास्पद होती, अशी टीका मुणगेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. 

वंचित बहुजन आघाडीच्या ४८ उमेदवारांपैकी केवळ प्रकाश आंबेडकर सोडले तर कोणीही निवडून येण्याची अजिबात शक्‍यता नाही, असा टोला ही या वेळी मुणगेकर यांनी लगावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Prakash Ambedkar Ramdas Athawale Politics Bhalchandra Mungekar