Loksabha 2019 : ऊर्मिला मातोंडकर यांचा प्रचारासाठी मॉर्निंग वॉक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज अद्याप दाखल केला नसला तरी प्रचारात नवनवीन तंत्र अवलंबण्यास सुरवात केली आहे. आज त्यांनी सकाळी सहा वाजता बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जाऊन जॉगिंगसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. मॉर्निंग वॉक करत त्यांनी मतदारांशी चर्चा केली.

दहिसर - उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज अद्याप दाखल केला नसला तरी प्रचारात नवनवीन तंत्र अवलंबण्यास सुरवात केली आहे. आज त्यांनी सकाळी सहा वाजता बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जाऊन जॉगिंगसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. मॉर्निंग वॉक करत त्यांनी मतदारांशी चर्चा केली.

राष्ट्रीय उद्यानात अचानक आलेल्या नेतेमंडळींमुळे काही वेळ उपस्थित नागरिकही चक्रावून गेले होते. मतदारांशी संवाद साधल्यानंतर ऊर्मिला यांनी रानमेव्याचा आस्वादही घेतला. तासाभरानंतर त्यांनी आपला मोर्चा बोरिवली पश्‍चिमेकडील साईबाबा नगर उद्यानाकडे वळवला. ऊर्मिला यांना पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी होत आहे. प्रचारादरम्यान अनेकदा त्यांच्यासोबत मेकअप्‌मन वा हेअर ड्रेसरही दिसत आहेत.

Web Title: Loksabha Election 2019 Urmila Matondkar Publicity Politics