Election Results : ईशान्य मुंबईत मनोज कोटक आघाडी तर संजय पाटील पिछाडीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

ईशान्य मुंबईत भाजपने शिवसेनेसोबतची युती टिकविण्यासाठी विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारली.

लोकसभा निकाल 2019 : ईशान्य मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील आणि भाजपचे मनोज कोटक यांच्यात प्रमुख लढत होत आहे. ईशान्य मुंबईत मनोज कोटक आघाडी आघाडीवर आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांना 233081 मते मिळाली तर भाजपच्या मनोज कोटक यांना 408699 मते मिळाली आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचे निहारिका खोंदालय यांना 48650 मते मिळाली आहेत.

भाजपने शिवसेनेसोबतची युती टिकविण्यासाठी विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारली. त्यांनी महापालिकेतील गटनेते मनोज कोटक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्याविरोधात उमेदवारी दिली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manoj Kotak leading in North East Mumbai Loksabha Constituency for Lok Sabha 2019