Election Results : शिवसेनेच्या वाघाची डरकाळी; 23 पैकी 19 जागांवर आघाडी!

गुरुवार, 23 मे 2019

भाजपशी युती करायची की नाही, यावरून चर्चा-खलबतं करून नंतर एकत्र आलेल्या शिवसेनेने यंदा पुन्हा एकदा लोकसभेत दणदणीत कामगिरी केली आहे. मुंबई आणि कोकणामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी लक्षणीय कामगिरी करत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला जोरदार धक्का दिला आहे.

मुंबई : भाजपशी युती करायची की नाही, यावरून चर्चा-खलबतं करून नंतर एकत्र आलेल्या शिवसेनेने यंदा पुन्हा एकदा लोकसभेत दणदणीत कामगिरी केली आहे. मुंबई आणि कोकणामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी लक्षणीय कामगिरी करत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. 

दुपारी दीडपर्यंतच्या आकडेवारीनुसार, शिवसेनेचे उमेदवार 19 जागांवर आघाडीवर होते. कोकण-ठाणेमध्ये पाच जागांवर शिवसेना आघाडीवर आहे. मुंबईतील तीन जागांवर शिवसेना, तर तीन जागांवर भाजपच आघाडीवर आहे. त्यामुळे मुंबईत सहाही जागांवर भाजप-शिवसेनाच जिंकण्याच्या मार्गावर आहे. 

गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजप-शिवसेनेमध्ये दुरावा निर्माण झाला होता. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी काडीमोड घेतला होता. निवडणुकीनंतर भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र आले असले, तरीही सत्तेत असूनही दोघेही एकमेकांवर सातत्याने टीका करत होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्ष युती करणार की नाही, याबद्दलही शंका होती. पण अखेर दोन्ही पक्षांनी युती केली आणि त्याचा परिणाम निकालांमध्ये दिसून येत आहे. 

ताज्या बातम्या आणि विश्‍वासार्ह निकालांसाठी डाऊनलोड करा 'सकाळ'चे ऍप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena performs well in Lok Sabha 2019 elections