South Central Mumbai Loksabha 2019 : काँग्रेस, शिवसेनेत थेट लढत; 53.61 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 April 2019

2014 च्या लोकसभा निवडणुकीत शेवाळे यांनी एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता. आता मात्र, यांच्यात जोरदार चुरस असून, गायकवाड यांनी आपल्या अनुभवाचा उपयोग करत प्रचार केला आहे. तर, विद्यमान खासदार शेवाळेंना शिवसेनेचे पाठबळ आहे. 

मुंबई : दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत असून, सेनेचे राहुल शेवाळे यांचा सामना अनुभवी काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांच्याविरुद्ध होत आहे. सायंकाळी सातपर्यंत 53.61 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

आज (सोमवार) सकाळपासून मतदानासाठी रांगा पाहायला मिळत आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शेवाळे यांनी एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता. आता मात्र, यांच्यात जोरदार चुरस असून, गायकवाड यांनी आपल्या अनुभवाचा उपयोग करत प्रचार केला आहे. तर, विद्यमान खासदार शेवाळेंना शिवसेनेचे पाठबळ आहे. 

दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा मतदारसंघात सर्वांत जास्त मतदान झाल्याचे दिसत आहे. दक्षिण मध्य मुंबईतील अणुशक्ती नगर : 53.79, चेंबूर : 55.75, धारावी : 47.10, सायन कोळीवाडा : 52.97, वडाळा : 56.92, माहिम : 55.78 या विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची नोंद झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena candidate Rahul Shewale and Congress candidate Eknath Gaikwad contest in South Central Mumbai