Kalyan Loksabha 2019 : श्रीकांत शिंदे शिवसेनेचा गड राखणार?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 April 2019

कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबाजी पाटील यांच्यात चुरशीची लढत आहे. कल्याण मतदारसंघामध्ये आज (सोमवार) सकाळपासून मतदानास सुरवात झाली. सायंकाळी 07 पर्यंत कल्याणमध्ये 42.99 टक्के मतदान झाले आहे.

मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबाजी पाटील यांच्यात चुरशीची लढत आहे. कल्याण मतदारसंघामध्ये आज (सोमवार) सकाळपासून मतदानास सुरवात झाली. सायंकाळी 07 पर्यंत कल्याणमध्ये 42.99 टक्के मतदान झाले आहे.

कल्याण हा शिवसेनेचा मतदारसंघ मानला जातो. गेल्या निवडणुकीमध्ये शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांच्यावर जवळपास अडीच लाख मतांनी विजय मिळविला होता. 

येथील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अंबरनाथ - 45.00
उल्हासनगर - 42.50
कल्याण पूर्व - 41.00
डोंबिवली - 43.20
कल्याण ग्रामीण - 46.50
मुंब्रा-कळवा - 39.00

मतदानाची अंतिम आकडेवारी अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shrikant Shinde faces Babaji Patil in Kalyan Constituency for LokSabha 2019