Thane Loksabha 2019 : ठाण्यात सातपर्यंत 50.22 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 एप्रिल 2019

आज सकाळपासून निवडणुकीसाठी शहरात अनेक मतदारसंघांमध्ये गर्दी पाहायला मिळाली. आज सकाळी सातपासून या मतदानाला सुरवात झाली. ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून, शिवसेनेची येथे राजकीय ताकद आहे. राष्ट्रवादीचे एकेकाळी वर्चस्व असलेल्या ठाण्यामध्ये चुरशीची लढत होईल हे नक्की. 

ठाणे : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील गडात शिवसेनेसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे आव्हान आहे. विद्यमान खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यात ही लढत असून, आज (सोमवार) सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. सायंकाळी सातपर्यंत 50.22 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

आज सकाळपासून निवडणुकीसाठी शहरात अनेक मतदारसंघांमध्ये गर्दी पाहायला मिळाली. आज सकाळी सातपासून या मतदानाला सुरवात झाली. ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून, शिवसेनेची येथे राजकीय ताकद आहे. राष्ट्रवादीचे एकेकाळी वर्चस्व असलेल्या ठाण्यामध्ये चुरशीची लढत होईल हे नक्की. राजन विचारे यांनी आज सकाळी सेंट जॉन बाप्टिस्ट हायस्कूल ठाणे (प) येथे मतदान केले. तर, आनंद परांजपे यांनी नौपाडा येथील बेडेकर विद्यालयात मतदान केले.

ठाण्यातील लोकसभा मतदारसंघातील ठाणे या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले. या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी खालीलप्रमाणे :

मीरा-भाईंदर : 50.10
ओवळा-माजीवडा : 50.17
कोपरी-पाचपाखाडी : 50.28
ठाणे : 50.19
ऐरोली : 50.29
बेलापूर : 50.29


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane Loksabha constituency voting starts Shivsena and NCP fights