#ResultsWithSakal उर्मिला मातोंडकरची ईव्हीएम विरोधात तक्रार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

उत्तर मुंबई मतदारसंघात गोपाळ शेट्टी हे आघाडीवर तर ऊर्मिला मातोंडकर पिछाडीवर आहे.

मुंबईः उत्तर मुंबई मतदारसंघामधून निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने ईव्हीएम विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित ट्विटही तिने केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली. उत्तर मुंबई मतदारसंघात गोपाळ शेट्टी हे आघाडीवर तर ऊर्मिला मातोंडकर पिछाडीवर आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण 17 लाख 83 हजार, 870 मतदार असून यंदाच्या निवडणुकीत 60 टक्के मतदान झाले आहे.

दरम्यान, 2014च्या लोकसभा निवडणुकीत उसळलेल्या मोदीलाटेने उत्तर मुंबई मतदारसंघात काँग्रेसची पार वाट लावली होती. भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांचा तब्बल 4 लाख 46 हजार 582 मतांनी पराभव केला होता. यावेळी या मतदारसंघात विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्यापुढे काँग्रेसने अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर हिच्या रूपाने तगडे आव्हान उभे केले आहे. ऊर्मिलानं धडाकेबाज प्रचार करून जोरदार हवा केली होती. त्यामुळे या लढतीकडे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Urmila Matondkar a complaint has been filed with the Election Commission