Election Results : उत्तर मुंबईत उर्मिला मांतोडकर यांचा पराभव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

- भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी केला उर्मिला मातोंडकर यांचा पराभव.

लोकसभा निकाल 2019 : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी विजयी झाले तर काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा पराभव झाला आहे.

लोकसभेच्या 19 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. त्यानुसार हे निकाल समोर आले आहे. गोपाल शेट्टी यांना 688992 मते मिळाली असून, उर्मिला मातोंडकर यांना 235764 मते मिळाली आहेत. 

मतमोजणीच्या सुरवातीलपासूनच गोपाळ शेट्टी आघाडीवर होते. त्यानंतर आता या मतदारसंघातील निकाल समोर आले आहेत. यामध्ये उर्मिला मातोंडकर यांचा पराभव झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Urmila Matondkar Defeated in North Mumbai Loksabha Constituency for Lok Sabha 2019