Loksabah 2019 : उदयनराजे समर्थकांवर अपहरण व ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लोकसभा 2019
सातारा : अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी ऍड. विकास पवार, ऍड. अंकुश जाधव, सुनिल काटकर व पंकज चव्हाण यांच्या विरोधात पळवून नेणे आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक आहेत.

बिचुकले यांनी सातारा लोकसभा मतदार संघातून त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी त्यांना या सर्वांनी धमकावले तसेच एका वाहनातून त्यास पळवून नेले. पैशाचे अमिष दाखवले तसेच प्रचार करू नये, असे फिर्यादीत म्हटले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abduction and atrocity cases filed against Udayan Rajya supporters