esakal | Loksabha 2019 : खराब ईव्हीएम मशीनमुळे प्रशासनाला नाकीनऊ
sakal

बोलून बातमी शोधा

EVM Machine

एकीकडे डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहत असताना दुसरीकडे खराब, बंद पडणाऱ्या ईव्हीएम मशीनमुळे प्रशासनाला घाम फुटला. कोल्हापुरातील मतदारांनी समजूतदारपणा दाखवून अर्धा-अर्धा तास मशीन दुरुस्त होण्याची वाट पाहिली. हीच परिस्थिती आगामी विधानसभा निवडणुकीवेळी राहिली, तर मात्र जिल्हा प्रशासनाला निवडणूक घेणे अवघड होणार आहे.

Loksabha 2019 : खराब ईव्हीएम मशीनमुळे प्रशासनाला नाकीनऊ

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर - एकीकडे डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहत असताना दुसरीकडे खराब, बंद पडणाऱ्या ईव्हीएम मशीनमुळे प्रशासनाला घाम फुटला. कोल्हापुरातील मतदारांनी समजूतदारपणा दाखवून अर्धा-अर्धा तास मशीन दुरुस्त होण्याची वाट पाहिली. हीच परिस्थिती आगामी विधानसभा निवडणुकीवेळी राहिली, तर मात्र जिल्हा प्रशासनाला निवडणूक घेणे अवघड होणार आहे.

लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघासाठी २७३२ आणि हातकणंगलेसाठी २३७४ मतदान (ईव्हीएम) मशीन होती. कोल्हापूर मतदारसंघात १५८ तर हातकणंगले मतदारसंघात ७४ हून अधिक मशीन बंद पडल्याने मतदान कक्ष अधिकारी, कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.

मतदान प्रक्रियेवर दर्जाहिन ईव्हीएम मशीनचा मोठा फटका बसत आहे.
सकाळी सात वाजता मतदान सुरू होतानाच जिल्ह्यातील ८ ते १० मतदान केंद्रांवरील मशीन सुरू झाली नाहीत, तर काही केंद्रांवर दहा ते पंधरा मिनिटात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्यामुळे निवडणूक कक्ष अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. प्रशासनाची तत्परतेमुळे कसे-बसे मशीन सुरू झाले. मतदारांनी संयम दाखवला म्हणून मतदान प्रक्रिया सुरळीत झाली. ही परिस्थिती केवळ कोल्हापूर, सांगली किंवा एक दोन लोकसभा मतदारसंघापूरते मर्यादित नाही, तर राज्यभर अशी दर्जाहीन ईव्हीएम मशीनमुळे प्रशासनाला मतदारांकडून रोष पत्कारावा लागला. 

राज्यातील ४८ लोकसभा मतदान केंद्रावर चार टप्प्यात मतदान होत आहे. ११ एप्रिलपासून याला सुरवात झाली आहे. काल (मंगळवारी) तब्बल तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर, हातकणंगले, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग अशा १४ लोकसभा मतदारसंघात चुरशीने मतदान झाले.  राज्यात एकूण ३० हजार ईव्हीएम मशीन वापरली आहे. यापैकी १८१० चाचणी घेतानाच बंद पडली आहेत, तर तिसऱ्या टप्प्यापर्यंतच्या निवडणुकीत ११७३ ईव्हीएम बंद पडली. अशी एकूण २९८० ईव्हीएम बंद पडली. दरम्यान, चौथ्या टप्प्यातही हाच अनुभव येणार आहे. 

loading image