Loksabha 2019 : अकलूजमध्ये मोदी बोलत होते अन् लोक निघून जात होते (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
बुधवार, 17 एप्रिल 2019

- पंतप्रधान मोदींचे भाषण सुरु असताना लोक सभेतून निघून जात होते.
- लोकांनी बसावे म्हणून प्रयत्न केला तरी काही उपयोग होत नव्हता

अकलूज : अकलूज येथिल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण सुरु असताना लोक सभेतून निघून जात होते. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. लोकांनी बसावे म्हणून प्रयत्न केला तरी काही उपयोग होत नव्हता. फिर एक बार मोदी सरकार असे पंतप्रधान मोदी म्हणत असताना लोक निघून जात होते.

दरम्यान, शरद पवार हे स्वतःचे नुकसान कधीच करत नाहीत. इतरांचा बळी गेला तरी चालेल. भगवे मैदान पाहून शरद पवारांनी मैदान का सोडले हे आता कळत आहे. ते खूप अनुभवी आहेत, हवेची दिशा पाहून ते निर्णय घेतात. शरद पवार निवडणुकीचे मैदान सोडून पळाले, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली या सभेत केली होती.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (बुधवार) अकलूज येथे सभा झाली. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, महादेव जानकर आदी प्रमुख नेते उपस्थित होते. माढ्यात युतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्यात लढत होत आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांचा सन्मान करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. तुम्ही अशीच महाराष्ट्राची सेवा करत रहा, असे उद्गार मोदींनी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याबद्दल काढले होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi was talking in Akluj Rally and people were going away