Election Results : आगे आगे देखिये हाेता है क्या - नरेंद्र पाटील (व्हिडिआे)

गुरुवार, 23 मे 2019

सातारा : आतापर्यंत फक्त 30 टक्के मतमोजणी झालेली आहे. सातारकरांनी परिवर्तनाला मतदान केले असेल अशी मला खात्री आहे आणि अंतिम टप्प्यात ते उघड होईल असा विश्वास शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान दुपारी 12 वाजे पर्यंत उदयनराजेंनी नरेंद्र पाटील यांच्या पेक्षा 39 हजार 369  मतांची आघाडी घेतली हाेती. 
आज (गुरुवार) सकाळी आठ वाजता मतमाेजणीस प्रारंभ झाला. दुपारी बारा पर्यंत 3 लाख 56 हजार 570 मतांची माेजणी झाली. यामध्ये उदयनराजे भाेसले यांना

एक लाख 90 हजार 644  मते तसेच नरेंद्र पाटील यांना एक लाख 51 हजार 275 मते मिळाली असून उदयनराजेंना 39 हजार 369 मतांची आघाडी हाेती. 
शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील हे मतमोजणी केंद्रावर आले हाेते. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले मला काही काळजी नाही. आतापर्यंत फक्त 30 टक्के मतमोजणी झालेली आहे. सातारकरांनी परिवर्तनाला मतदान केले असेल अशी मला खात्री आहे आणि अंतिम टप्प्यात ते उघड होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण मतदान ः 18 लाख 38 हजार 139

प्रत्यक्ष झालेले मतदान ः 11 लाख 94 हजार 434 (60.33 टक्के).

दुपारी बारा पर्यंत झालेली माेजणी ः 3 लाख 70 हजार 439

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Patil Says Wait & Watch