Election Results : उदयनराजेंनी आत्मपरीक्षण करावे - सातारकराचे पत्र

शुक्रवार, 24 मे 2019

सातारा ः लाेकसभा मतदारसंघात पून्हा एकदा उदयनराजे भाेसले हे विजयी झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत उदयनराजे भाेसले यांना 5 लाख 79 हजार 26 मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार 498 मते मिळाली आहेत. यंदाच्या निवडणुकीत 9 हजार 106 मतदारांनी नाेटास पसंती दिली आहे. 

सातारा ः लाेकसभा मतदारसंघात पून्हा एकदा उदयनराजे भाेसले हे विजयी झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत उदयनराजे भाेसले यांना 5 लाख 79 हजार 26 मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार 498 मते मिळाली आहेत. यंदाच्या निवडणुकीत 9 हजार 106 मतदारांनी नाेटास पसंती दिली आहे. 
उदयनराजे निवडून आले असले तरी त्यांनी मतदारसंघात काम करावे अशी अपेक्षा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष व्यक्त हाेत आहे. मतमाेजणीचा कल समजातच गुरुवारी (ता.23)  साेशल मिडियाद्वारे सातारकरांनी उदयनराजेंकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या. एका सातारकराने त्यांना लिहिले पत्र तुफान व्हायरल झाले. 

व्हायरल झालेल्या पत्रातील मजूकर असा - 

मा. श्री. छ. उदयनराजे यांस,
सर्व प्रथम आपण पुन्हा एकदा निवडून आलात त्या बद्दल आपले अभिनंदन. आपण विजय साजरा करण्यात मश्गुल होण्या आधी आणि पुन्हा 4 वर्षांसाठी गायब होण्याआधी आपल्याला काही परिस्थितींची जाणीव करून देण्याचा हा माझा केविलवाणा प्रयत्न...
आपण निवडून आलात खरे पण जी 4 ते 5 लाख मते आपल्या विरोधकांना पडलेली आहेत ती केवळ मते नाहीत तर साताऱ्याचे 4 ते 5 लाख दुखावलेली जनता आहे.
मागच्या वेळी आपण 3.5 लक्ष इतक्या यशस्वी लीडने जिंकून आला होतात पण यंदा ते लीड काही हजारांवर आले आहे यावरून आपण काय ते ओळखावे. केवळ आपले दैवच बलवत्तर आणि आपल्या साताऱ्यातील काही सरंजाम शाही मधून अजून बाहेर न पडलेल्या जनतेमुळेच आपण निवडून आलात.
जी 3 ते 4 लाख मते आपल्या विरोधात आहेत ती कोणा भक्कम उमेदवारामुळे नाही तर आपल्या दुर्लक्षितपणाला त्रासलेल्या सातारच्या युवकांची आहेत.
गेल्या 10 वर्षांच्या आपल्या सत्ते मध्ये आपण आमच्यासाठी काय उभारू शकलात हे मोजायचे झाले तर एका हाताची पाच बोटे पण जास्त पडतील.
शिक्षण संस्था , शाळा , कॉलेज, कारखाने ,कंपनी , उद्योग संस्था या पैकी काहीच आपण उभारू न शकल्याने आमच्या सारख्या अनेक तरुणांना सातारा सोडून पुणे मुंबई सारख्या शहरात कामासाठी भटकत फिरावे लागते आहे. याचा आपण सखोल विचार करावा आणि जिंकल्याचा आनंद साजरा करण्या पेक्षा आपण इतके सातारकर का दुखावले गेले आहेत याचा विचार करावात ही विनंती.
आपल्या नावापुढे छत्रपती ही पदवी आहे त्यामुळे आपला नेहमी आदर राहीलच परंतु छत्रपती घराण्याचा पराभव व्हावा ही वेळ आपणावर आणि एक रयत म्हणून आमच्यावर पुन्हा येऊ नये हीच सदिच्छा.

।।जय शिवराय।।

एक त्रस्त सातारकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satarkar writes a letter to Udayanraje bhonsle