Election Results उदयनराजेंची आठ हजार मतांनी आघाडी

Election Results उदयनराजेंची आठ हजार मतांनी आघाडी

सातारा - लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज उदयनराजेंविरुद्ध माथाडी नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील अशी लढत झाली आहे. या निकालाबाबत दोन्ही बाजूंकडून तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. हॅट्ट्रिक साधताना उदयनराजेंचे मताधिक्‍य कमी होणार की वाढणार, यासोबतच नरेंद्र पाटील परिवर्तन करून इतिहास घडविणार, या चर्चांना आज पूर्णविराम मिळणार आहे. कशाहीतील मतदारराजाने कोणाला दिल्लीत जाण्याची संधी दिली, याचा उलगडा होणार आहे.
आज (गुरुवार) सकाळी आठ वाजता वखार महामंडळात मतमोजणीस प्रारंभ झाला. प्रारंभी पोस्टल मतदानाची मोजणी झाली.
यामध्ये उदयनराजे भोसले यांनी सातारा विधानसभा वगळता उर्वरीत मतदार संघात 8000 मतांची आघाडी घेतली आहे. टपाल मतांमध्ये उदयनराजे आघाडीवर आहेत.
लोकसभा निवडणुकीत यावेळेस सुरवातीपासूनच वेगळीच परिस्थिती होती. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असूनही पक्षाचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला सुरवातीला पक्षातून विरोध झाला. पण, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वांना सरळ करत तिसऱ्यांदा उदयनराजे भोसले यांनाच तिकीट दिले. तर दुसरीकडे भाजपचे नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सातारा लोकसभेसाठी तयारी सुरू केली. पण, सातारा मतदारसंघ युतीच्या वाटपात शिवसेनेकडे असल्याने तिकिटाची अडचण झाली. शेवटी नरेंद्र पाटील यांना शिवसेनेत घेऊन त्यांना तिकीट देण्यात आले. त्यामुळे राजे विरुद्ध माथाडी नेते, अशी लढत झाली. या लढतीनंतर निकालाबाबत सुरवातीपासूनच दोन्ही पक्षांसह सामान्य जनतेतूनही अनेक तर्कवितर्क वर्तविले जाऊ लागले.
कऱ्हाड, पाटणमध्ये नाराजी असल्याने उदयनराजेंचे मताधिक्‍य कमी होणार, सर्वसामान्य मतदार परिवर्तनासाठी नरेंद्र पाटील यांना साथ देणार, साताऱ्यात धक्कादायक व अनपेक्षित निकाल लागणार आदी चर्चांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले होते.
उदयनराजेंचे मताधिक्‍य दीड ते अडीच लाख असेल असे म्हणणारे राष्ट्रवादीचे नेते निकालाची तारीख जवळ येईल, तसेच 50 हजार, 75 हजार, एक लाख असे मताधिक्‍याचे आकडे कमी कमी सांगू लागले आहेत. पण, प्रत्यक्षात मतदार राजाने कोणाच्या पारड्यात किती मते टाकलीत, हे मतमोजणीतच स्पष्ट होणार आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात
एकूण मतदान ः 18 लाख 38 हजार 139
प्रत्यक्ष झालेले मतदान ः 11 लाख 94 हजार 434 (60.33 टक्के).
विधानसभा निहाय मतदान असे : वाई - 60.36, कोरेगाव : 60.65 , कराड उत्तर : 63.04, कराड दक्षिण : 63.11, पाटण : 55.87, सातारा : 59.22 - एकूण ः 60.33.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com