Election Results : उदयनराजे सातारा विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर

गुरुवार, 23 मे 2019

सातारा - सातारा लाेकसभा मतदारसंघात उदयनराजेंनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या पेक्षा 12 हजार मतांनी आघाडी घेतली आहे.
आज (गुरुवार) सकाळी आठ वाजता वखार महामंडळाच्या गाेदामात मतमोजणीस प्रारंभ झाला. दरम्यान पोस्टल मतदानात सातारा विधानसभा मतदारसंघात उदयनराजेंना अपेक्षित मते मिळाली नाहीत.
आता टप्प्याटप्याने मतमाेजणी सुरु आहे. यामध्ये आनंद थोरावडे (324 मते), राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उदयनराजे भोसले (73146), शिवसेनेचे नरेंद्र पाटील ( 60860), दिलीप जगताप (253), सहदेव एवळे

(5445), अभिजित बिचुकले (115), शैलेंद्र वीर (273), सागर भिसे (438) यांना इतकी मते मिळाली. तसेच 479 मते नोटाची हाेती. 
पहिल्या फेरीत उदयनराजेंना सातारा विभानसभा मतदारसंघ वगळता अन्य मतदारसंघातून सर्वाधिक मते मिळाली आहेत. 
सातारा लाेकसभा मतदारसंघाती मतमाेजणी संथ गतीने सुरु आहे. मतमाेजणी ठिकाणावरील सर्व्हर डाऊन झाल्याने मतमाेजणीस विलंब लागत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.  
दरम्यान यंदाच्या निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले होते. सुरवातीला उदयनराजेंचे मताधिक्‍य दीड ते अडीच लाख असेल असे म्हणणारे राष्ट्रवादीचे नेते निकालाची तारीख जवळ येईल, मताधिक्‍याचे आकडे कमी कमी हाेईल असे लागले आहेत. पहिल्या फेरीतच (पाेस्टल) उदयनराजेंना सातारा - जावली विधानसभा मतदारसंघातून कमी मते मिळाली आहेत. या विधानसभा मतदारसंघातील सातारा पालिका त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. तसेच त्यांचे चुलत बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्याशी झालेले मनाेमिलनामुळे सातारा विधानसभा मतदारसंघातून उदयनराजेंना सर्वाधिक मते मिळतील अशी शक्यता आहे.
सातारा विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी नेमके काय केले आहे हे आगामी फेऱयांमध्ये सपष्ट हाेईलच. 
सातारा लोकसभा मतदारसंघात
एकूण मतदान ः 18 लाख 38 हजार 139
प्रत्यक्ष झालेले मतदान ः 11 लाख 94 हजार 434 (60.33 टक्के).

विधानसभा निहाय मतदान असे : वाई - 60.36, कोरेगाव : 60.65 , कराड उत्तर : 63.04, कराड दक्षिण : 63.11, पाटण : 55.87, सातारा : 59.22 - एकूण ः 60.33.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayanraje bhonsle trails in satara vidhansabha Constituency