esakal | Loksabha 2019 : वंचित आघाडी वंचितांना सत्तेपासून लांब ठेवण्यासाठीच : आठवले
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas Athwale

वंचित बहुजन आघाडी ही वंचितांना सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी तयार झाली आहे. तर काँग्रेस वाले राज ठाकरे यांच्या मागे लागले असले तरीही मनसेचे इंजिन बंद आहे.

Loksabha 2019 : वंचित आघाडी वंचितांना सत्तेपासून लांब ठेवण्यासाठीच : आठवले

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली :  वंचित बहुजन आघाडी ही वंचितांना सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी तयार झाली आहे. तर काँग्रेस वाले राज ठाकरे यांच्या मागे लागले असले तरीही मनसेचे इंजिन बंद आहे. त्या इंजिन मध्ये डिझेल नाही त्यामुळे ते पुढे जाणार नाही.  अशी टिका केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले वंचित बहुजन आघाडी आणि मनसेवर केली. सांगलीतील महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचार सभेत आठवले बोलत होते.

आठवले म्हणाले, सांगली मध्ये काँग्रेसला संपवण्याचे काम काँग्रेसच करत आहे. सांगलीची जागा असल्याची जाणीव झाल्यानेच ती स्वाभिमानीला देण्यात आली. परंतु, विशाल पाटील यांनी स्वाभीमानीत जायला नको होते. ज्या काँग्रेसने वसंतदादा पाटील यांची मानहानी करण्याचे काम केले त्यांच्यासोबत जाणे चुकीचे आहे.

56 लोकांची आघाडी कधी असू शकत नाही. मोदींचे विरोधक मोदी पुन्हा सत्तेवर येता कामा नये असे म्हणत असताना जनता मात्र, मोदीच निवडूण येणार असल्याचे बोलत आहे. आमची महायुती आघाडीला  पुरून उरणार आहेत..

आठवलेेंची कवीता :
काकाने मजबूत केला आहे.. प्रत्येक नाका.. कमळाला मतदान करून मुख्यमंत्री यांचा मान राख.. मी कधीच खात नाही भाव जर माझ्या अंगावर आले तर त्यांचा उडवून टाकू भाव..

loading image