Loksabha 2019: दौंडमधील 193 मतदान केंद्रावर 72 टक्के मतदान

रमेश वत्रे
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

दौंड तालुक्यातील 300 बुथपैकी 193 बुथवर सरासरी 72.50 टक्के मतदान झाले आहे. दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्टयात वरवंडपर्यंतच्या गावात सरासरी ६८ टक्के मतदान झाले आहे. दौंड तालुक्यात गेल्यावेळी पेक्षा 05 टक्के मतदान वाढले आहे. वाढलेल्या मतांचा फायदा कोणाला होणार याची उत्सुकता आहे.
 

दौंड: दौंड तालुक्यातील 300 बुथपैकी 193 बुथवर सरासरी 72.50 टक्के मतदान झाले आहे. दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्टयात वरवंडपर्यंतच्या गावात सरासरी ६८ टक्के मतदान झाले आहे. दौंड तालुक्यात गेल्यावेळी पेक्षा 05 टक्के मतदान वाढले आहे. वाढलेल्या मतांचा फायदा कोणाला होणार याची उत्सुकता आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजपच्या कांचन कुल यांच्यात प्रमुख लढत झाली. हाती आलेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार दौंड तालुक्यातील 12 बुथवर 80 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. 39 बुथवर 75 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. 62 बुथवर 70 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. 80 बुथवर 65 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. दौंड शहरात एकूण 55 बुथ आहेत. 55 बुथमध्ये सरासरी 45.40 टक्के मतदान झाले आहे. 

दौंड शहरातील दोन बुथवर 14 टक्के तर एका बुथवर 12 टक्के मतदान झाले आहे. निकालाबाबत भाजपचे मतदार संघाचे प्रभारी वासुदेव काळे म्हणाले की, बारामती लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना या 25 हजाराच्या मताधिक्याने विजयी होतील. महायुतीतील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केल्याने तालुक्यतील मतांची टक्केवारी वाढली आहे. या वाढलेल्या मतांचा फायदा कांचन कुल यांना होईल.

गेल्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांना तालुक्यातून 25 हजाराचे मताधिक्य मिळाले होते. यंदा कांचन कुल यांना दौंड तालुक्यातून 30 हजाराचे मताधिक्य राहिल. आमच्या शिरापूर गावात 1480 मतदान असून यातील 90 मतदार मयत आहेत. तर 210 मतदार हे स्थलांतरीत आहेत. तरीही यागावात 56.41 टक्के मतदान झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 72 percent polling in 193 polling booths in Daund