Loksabha 2009 : शिवतारे आमदार कसे होतात हेच बघतो : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 April 2019

"विजय शिवतारे 2019 च्या निवडणुकीमध्ये तुम्ही आमदार कसे होतं तेच मी बघतो आणि एकदा अजित पवार याने ठरवलं तर अजित पवार कुणाच्या बापाचा ऐकत नाही हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे.

बारामती : लोकसभा निवडणुक प्रचाराच्या तोफा थंडावत असतानाच आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेत विजय शिवतारे यांना जाहीर आव्हान दिले.

बारामतीत येऊन पवारांवर टीका करणारे विजय शिवतारे 2019 ला आमदार कसे होतात तेच मी बघतो असे जाहीर आवाहन अजित पवार यांनी यांनी दिले.

सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेमध्ये बोलताना आज पवार यांनी शिवतारे यांना लक्ष्य करत त्यांच्यावर तोफ डागली. बारामतीत येऊन पवारांनी काय केले असे विचारणार्‍या विजय शिवतारे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार होऊ देणार नाही असा इशारा अजित पवार यांनी दिला.

यावेळी अजित पवार म्हणाले, "विजय शिवतारे 2019 च्या निवडणुकीमध्ये तुम्ही आमदार कसे होतं तेच मी बघतो आणि एकदा अजित पवार याने ठरवलं तर अजित पवार कुणाच्या बापाचा ऐकत नाही हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, त्यामुळे आपण कसे आमदार होता तेच मी बघतो" 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar says he is trying for Vijay Shivtare will not be elected as MLA