Loksabha 2019: कांचन कुल म्हणजे झाशीची राणी आहेत- मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 April 2019

- फडणवीस यांनी कांचन कुल यांना झाशीच्या राणीची उपमा दिली
- कांचन कूल म्हणजे आमची झाशीची राणी आहे
- ही झाशीची राणी आम्ही बारामतीच्या मैदानात उतरवली आहे
- हीच झाशीची राणी मैदान जिंकणार असल्याचा विश्वास

इंदापूर (पुणे) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना आज (ता.21) थेट झांशीच्या राणीची उपमा दिली. फडणवीस म्हणाले की, कांचन कूल म्हणजे आमची झाशीची राणी आहे आणि ही झाशीची राणी आम्ही बारामतीच्या मैदानात उतरवली आहे. ही झाशीची राणी मैदान जिंकणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

फडणवीस पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रमाणे 'बेटी बचाव'चा नारा दिला, त्याप्रमाणे आता शरद पवार 'बेटी बचाव, बेटी बचाव' असं म्हणत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या युतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रासपचे महादेव जानकर, राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कितीही वेळा म्हणालात लाव रे व्हिडीओ, लाव रे व्हिडीओ मग जर 2014सालचा व्हिडीओ लावला तर काय होईल? राहुल गांधी यांचे पणजोबा, आजी, वडील आले पण गरिबी हटवली नाही. आता काय खाऊन ते गरिबी हटवणार? असा प्रश्नही त्यांनी काँग्रेसवर टीका करताना केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadanvis compare kanchan kul as a Lakshmibai the Rani of Jhansi