कारणराजकारण: लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे सामान्यांत आक्रमकता (व्हिडिओ)

गुरुवार, 18 एप्रिल 2019

पुणे लोकसभा मतदारसंघातील भागात निवडणुकीच्या निमित्ताने 'सकाळ' सोशल मीडियावर मतदारांशी संवाद साधत आहे. स्थानिक प्रश्नांचा वेध घेतानाच कोणते मुद्दे अग्रक्रमावर राहिले पाहिजेत, याचीही चर्चा मतदारांमध्ये घडवून आणत आहे.

ताडीवाला (पुणे) : कारणराजकारणच्या मालिकेतील ताडीवाला या भागात केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये येथील नागरिकांची संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाली. वर्षांनूवर्षे रखडलेल्या विकास कामांमुळे व्यक्त होणारे येथील नागरिक आक्रमक झाले आहेत. 

महानगरपालिकेची शाळा या भागात नाही. लगतच्या भागात महापालिका शाळा आहे, तिथे मुलं शिकायला जातात. पण त्या शाळेवर विशिष्ट पक्षाच्या नगरसेवक, कार्यकर्त्यांचे वर्चस्व आहे. बेरोजगारीचा प्रश्न आहे. 'राजकीय पुढाऱ्यांना इच्छाशक्तीच नसल्यामुळे रोजगार उपलब्ध करून दिले गेले नाहीत आणि त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण या भागात दिवसेंदिवस वाढत असल्याचे' येथील तरुणाईचे म्हणणे आहे.

महिला सुरक्षेचा प्रश्न या भागात राहणाऱ्या महिलांना भेडसावत आहे. महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होईल अशा प्रकारची व्यवस्था समाजात उभी करण्याची गरज असल्याचे येथिल महिलांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussion with citizens at tadiwala area in Pune cantonment board