#Loksabha2019 : मोदींकडून चुकीची आकडेवारी; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांची टीका 

anand-sharama.jpg
anand-sharama.jpg

पुणे : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आकडे कळत नाहीत. ते समजून घेत नाहीत आणि इतर कोणाचे ऐकूनही घेण्याची त्यांची मनःस्थिती नाही. त्यातूनच विकासाच्या गप्पा मारताना मोदी चुकीचे आकडे मांडत आहेत'', अशी बोचरी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केली. महिला सक्षमीकरण धोरणही फसल्याने सरकारने महिलांचा अवमान केल्याचा ठपकाही शर्मा यांनी भाजप सरकारवर ठेवला. 

काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारासाठी शर्मा पुण्यात आले होते. दरम्यान, पत्रकार परिषद घेऊन त्यांनी काँग्रेसची भूमिका मांडली. पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, उल्हास पवार आदी उपस्थित होते. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, नोटाबंदी, जीएसटी, महागाई आदी मुद्द्यांकडे लक्ष वेधत शर्मा यांनी भाजप सरकारचे अपयश पटवून देण्याचा प्रयत्न केला.

शर्मा म्हणाले, "उद्योग-धंदे आणून देशांतर्गत रोजगारनिर्मिती करून प्रत्येकाच्या हाताला काम देण्याची घोषणा केली होती. अर्थव्यवस्थेला गती मिळालेली नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात "ना खासगी ना सार्वजनिक गुंतवणूक' आली. त्यामुळे रोजगार उपलब्ध झालेले नाहीत. बॅंकांकडे पैसा नाही आणि उद्योग बुडत आहेत. तेव्हा अर्थव्यवस्थेचे काय होणार? पण, भाजप सरकार निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे.'' भाजपने जुनाच जाहीरनामा पुन्हा नवा केला आहे. त्यातील एकही गोष्ट त्यांना पूर्ण करता आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आरोग्य सेनेचे प्रमुख डॉ. अभय वैद्य यांनी या वेळी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com