Election Result : गिरीश बापट यांची दोन लाखांची आघाडी 

pune_bapat.jpg
pune_bapat.jpg

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतमोजणीच्या तेराव्या फेरीत भाजप-सेना युतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्यापेक्षा दोन लाख सात हजार 506 मतांनी आघाडी घेतली आहे. भरघोस मताधिक्‍क्‍यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. 

दहाव्या फेरीमध्ये बापट यांनी एक लाख 60 हजार मतांची आघाडी घेतली. सहाव्या फेरीची मतमोजणी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान पूर्ण झाली आहे. यामध्ये बापट यांना 29 हजार 970 तर जोशी यांना 15 हजार 141 मते मिळाली. सहा फेऱ्यांमध्ये बापट यांना 95 हजार 233 मतांची आघाडी मिळाली. दरम्यान, सहाव्या फेरीदरम्यान ईव्हीएम मशिनबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले.
 
पाचव्या फेरीमध्ये बापट यांना 31 हजार 109 तर जोशी यांना 13 हजार 343 मते मिळाली. या फेरीत बापट यांनी 17 हजार 766 मतांची आघाडी घेतली. पहिल्या चार फेऱ्यांमध्ये बापट यांना 62 हजार 678 मतांची आघाडी मिळाली होती. दरम्यान, दुपारी 12 नंतर चौथ्या फेरीची मतमोजणी सुरू झाली असून त्यामध्ये वडगावशेरी व कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये बापट यांनी आघाडी घेतली होती. या फेरीमध्ये बापट यांना 28 हजार 494 तर जोशी यांना 12 हजार 556 मते मिळाली. यामध्ये बापट यांनी 15 हजार 938 मतांची आघाडी मिळविली. 

पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये बापट यांना 91 हजार 255 तर जोशी यांना 45 हजार 230 मते मिळाली. यामध्ये बापट हे 46 हजार 25 मतांनी आघाडीवर आहेत. तिसऱ्या फेरीची मतमोजणी दुपारी 12 वाजता पूर्ण झाली आहे. यामध्ये बापट यांना 28 हजार 208 तर जोशी यांना 13 हजार 116 मते मिळाली. यामध्ये बापट यांनी 15 हजार 92 मतांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांनी पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नऊ हजार मते मिळविली. 

दुसऱ्या फेरीत बापट यांना 33 हजार 151 तर जोशी यांना 17 हजार 990 मते मिळाली. यामध्ये बापट यांनी 15 हजारांची आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीतही बापट यांनी 15 हजार 772 मतांची आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीमध्ये गिरीश बापट यांना 21 हजार 896 तर मोहन जोशी यांना 14124 एवढी मते मिळाली. दरम्यान, काँग्रेसने ईव्हीएम मशिनबाबत आक्षेप घेतल्याचे येथील मतमोजणी ठप्प झाली होती. मतमोजणीनंतर ईव्हीएम मशिन सील करावे लागते. त्याच्यावर मतदान अधिकाऱ्याची सही घ्यावी लागते. मात्र, त्यावर त्यांची सही नव्हती. त्यामुळे हे व्हीव्हीपॅट मशिन बाजूला ठेवले आहे. असे असले तरी दुसरी फेरीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 
पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये 23 एप्रिल रोजी मतदान झाले. यामध्ये भाजप-शिवसेना युतीकडून गिरीश बापट, काँग्रेस आघाडीकडून मोहन जोशी तर वंचित बहुजन विकास आघाडीकडून अनिल जाधव हे उमेदवार उभे होते. तब्बल महिनाभरानंतर आज गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास मतमोजणीस सुरवात झाली आहे. त्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांनीही मतमोजणी केंद्रावर गर्दी केली आहे. 

पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या चार जागांसाठी आपले नशीब अजमावणाऱ्या पालकमंत्री बापट, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, पार्थ अजित पवार यांच्यासह 93 उमेदवारांच्या भविष्याचा फैसला आज होणार आहे. जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत झालेल्या चुरशीच्या लढतींमुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पुणे जिल्ह्यातील चार जागांसाठी दोन टप्प्यांत निवडणूक झाली होती. पुणे शहरात 10.34 लाख (49.84 टक्के), मावळमध्ये 13.66 लाख (59.49 टक्के) शिरूरमध्ये 12.92 लाख (59.46 टक्के), तर बारामतीमध्ये 12.99 लाख (61.54 टक्के) मतदान झाले. यंदा प्रथमच मतदानाच्या वेळी "व्हीव्हीपॅट'चा वापर करण्यात आला. पुण्यात भाजपचे गिरीश बापट आणि काँग्रेसचे मोहन जोशी यांच्यात थेट लढत होत आहे. 

मतदारसंघात असे आहेत उमेदवार 
पुणे : 31 
मावळ : 21 
बारामती : 18 
शिरूर : 23 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com