Loksabha 2019 : यंदा सुप्रिया सुळेंचा पराभव होणारच : विजय शिवतारे

उमेश घोंगडे
गुरुवार, 14 मार्च 2019

पुणे : 'बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अदयाप उमेदवार निश्चित व्हायचा आहे. उमेदवार कोणताही असला, तरी सुप्रिया सुळे यांचा पराभव अटळ आहे.'' ,असे भाकीत जलसंपदा राज्यमंत्री आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी आज पुण्यात केले. 

बारामती लोकसभा मतदार संघातील पुंरदर विधानसभा मतदार संघातून शिवतारे आमदार म्हणून निवडून आले आहेत. शिवतारे म्हणाले, ''राज्यात पवार यांच्या विरोधात लाट आहे. मावळ मतदार संघातून पार्थ यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. पार्थ यांचे कर्तृत्व काय?'' असा प्रश्न त्यांनी यावेळी केला.

''खासदार सुप्रिया सुळे वडील शरद पवार यांच्या नावावर राजकारण करीत आहेत. केवळ वडिलांच्या जीवावर जास्त काळ राजकारण करता येत नाही, हे खासदार सुळे यांनी लक्षात ठेवावी, अशी टिका शिवतारे यांनी केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 : Supriya Sule will be defeated this year : Vijay Shivtare