Loksabha 2019 : मतभेद विसरून कामाला लागा - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मार्च 2019

उरण - ‘मावळ मतदारसंघामध्ये शिवसेना-भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने कामाला लागावे,’’ असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उरण येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये केले. ‘‘मावळ मतदारसंघात आपला उमेदवार मोठ्या मताधिक्‍याने निवडून आणायचा असेल तर सर्वांनी मतभेद विसरून कामाला लागावे.’’ या वेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माणिकराव जगताप, आमदार बाळाराम पाटील उपस्थित होते.

कर्जतमध्येही संवाद
कर्जत - अजित पवार यांनी मंगळवारी सायंकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सर्वांना विश्‍वासात घेण्यात येईल आणि मागील काळात झालेल्या चुका होणार नाहीत, अशी ग्वाही देत पार्थ पवार यांना निवडून आणा, असे आवाहन केले. 

यावर काँग्रेसनेही प्रतिसाद देत मदत करण्याचा शब्द दिला. दुसरीकडे पार्थ पवार यांनी मंगळवारी (ता. १९) कळंबोली येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला, तर अजित पवार यांनी सायंकाळी कळंबोलीत हजेरी लावली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Ajit Pawar Politics