Loksabha 2019 : बिबवेवाडीतील ‘गोल्डन ट्रॅंगल’ निवडणार तीन खासदार!

नितीन बिबवे
बुधवार, 17 एप्रिल 2019

बारामती, शिरूर आणि पुण्यातील खासदार निवडण्यासाठी बिबवेवाडीतील मतदारांचीही गरज भासणार आहे. या तिन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी येथील १०२ बूथमधील एक लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क दोन टप्प्यांत बजावणार आहेत. त्यामुळे बिबवेवाडीतील ‘गोल्डन ट्रॅंगल’ कोणाला भावणार, हे २३ मे रोजीच उघड होणार आहे.

बिबवेवाडी - बारामती, शिरूर आणि पुण्यातील खासदार निवडण्यासाठी बिबवेवाडीतील मतदारांचीही गरज भासणार आहे. या तिन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी येथील १०२ बूथमधील एक लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क दोन टप्प्यांत बजावणार आहेत. त्यामुळे बिबवेवाडीतील ‘गोल्डन ट्रॅंगल’ कोणाला भावणार, हे २३ मे रोजीच उघड होणार आहे.  

बिबवेवाडी गावठाण व परिसर लोकसभेच्या तिन्ही मतदारसंघांत विभागला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील बिबवेवाडी गावठाणासह अप्पर इंदिरानगरचा भाग येतो. त्याचे एकूण ७२ बूथ आहेत. बारामती मतदारसंघात अप्पर इंदिरानगर व सुखसागरनगरचा भाग येत असून, तेथे एकूण २१ बूथ आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात सुखसगारनगरचा भाग येतो. त्याचे ९ बूथ आहेत. त्यामुळे तिन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार, कार्यकर्त्यांची रेलचेल बिवेवाडीत सुरू आहे. बूथनुसार बिबवेवाडीतील ७५ हजार मतदार पुण्यासाठी, तर २१ हजार मतदार बारामतीसाठी, तर शिरूरसाठी नऊ हजार मतदार मतदान करतील. बिबवेवाडी परिसरातील अप्पर, सुप्परचा भाग अतिसंवेदनशील भाग म्हणून परिचित आहे. त्यामुळे तेथे सुमारे १५० पोलिसांचा कडेकोट पोलिस बंदोबस्त आहे. बिबवेवाडी परिसरातील गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई केलेली असून, संवेदनशील भागांमध्ये रूट मार्च करण्यात आला आहे, असे बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मुरलीधर कराळे यांनी सांगितले.

Web Title: Loksabha Election 2019 Bibvewadi MP Selection Politics