Loksabha 2019 : पुण्यासह चार मतदारसंघांत २५७ केंद्रे अतिसंवेदनशील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

जिल्हा निवडणूक प्रशासनाने जिल्ह्यातील अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची यादी तयार केली आहे. त्यात पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात २५७ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्या केंद्रांवर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

पुणे - जिल्हा निवडणूक प्रशासनाने जिल्ह्यातील अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची यादी तयार केली आहे. त्यात पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात २५७ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्या केंद्रांवर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

या निवडणुकीत जिल्ह्यातील चार मतदारसंघात मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यानुसार मतदान केंद्रांच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. पुणे मतदारसंघात एक हजार ९४४ मतदान केंद्रे, बारामती मतदारसंघात दोन हजार ३०३, मावळ मतदारसंघात दोन हजार ४०५ आणि शिरूर मतदारसंघात दोन हजार २७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मागील काही निवडणुकीत ज्या मतदान केंद्रांवर दुबार मतदान, फेरफार, गोंधळ आणि इलेक्‍ट्रॉनिक व्होटर मशीनमध्ये (ईव्हीएम) बिघाड होण्याचे प्रकार घडले होते. अशी २५७ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील म्हणून घोषित केली आहेत. 

त्यात पुणे मतदारसंघात सर्वाधिक ९२ मतदान केंद्रे, मावळ ८४ (उरण, कर्जत, पनवेल), बारामती ६२ आणि शिरूर मतदारसंघातील १९ केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांवर एक हजारपेक्षा जास्त व्हिडिओ कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Loksabha Election 2019 Constituency Susceptible