Loksabha 2019 : मावळ लोकसभा मतदारसंघ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार आमनेसामने आहेत. या लढतीचे चित्र नेमके कसे राहील याविषयी.

श्रीरंग बारणे - 
  वय : ५५
  शिक्षण : दहावी

पार्थ पवार
  वय : २९  
  शिक्षण : बी. कॉम. एलएलबी

श्रीरंग बारणे -  जमेच्या बाजू
  विद्यमान खासदार. सलग चार वर्षे संसद रत्न पुरस्कार.
  गेल्या वर्षात मेट्रो, पीएमआरडीए, रिंगरोड, विकास आराखडा, स्मार्ट सिटीसाठी योगदान. 
  मोठा जनसंपर्क; मतदारसंघात कार्यकर्त्यांचे जाळे 
  घटक पक्ष भाजप, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष यांच्याशी चांगले संबंध 
  पनवेल, उरण, पिंपरीत शिवसेनेचे आमदार, मावळ व चिंचवडमध्ये भाजपचे आमदार

पार्थ पवार - जमेच्या बाजू
  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव. 
  तरुण उमेदवार. पक्षाची सर्व मदत मिळण्याची शक्‍यता 
  पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसची सक्रिय साथ
  मावळ तालुक्‍यातील पक्षीय गटतट कमी करण्यात अजित पवार यांना यश
  शेतकरी कामगार पक्षाची भक्कम साथ

श्रीरंग बारणे - विरोधातील मुद्दे
  भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप यांचा विरोध 
  शहरातील वाहतूक, कचरा, पाणी, एसआरए आदी प्रश्‍नांबाबत ठोस उपाययोजना नाही 
  भाजपच्या कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेत नसल्याचा आरोप

पार्थ पवार - विरोधातील मुद्दे
  सलग तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात असल्याने अँटी इन्कंबन्सीचा धोका
  भाजपच्या उमेदवाराचे माहेर आणि सुळे यांचे माहेर बारामतीच असल्याने, या तालुक्‍यात मतविभाजन होण्याची शक्‍यता 
  विरोधी उमेदवार दौंड तालुक्‍यातील असल्याने, या तालुक्‍यातील मतांचेही विभाजन होण्याचा संभव

आतापर्यंत मावळ लोकसभेत मिळालेले यश (२००९ पासून) 
मतदारसंघातील पक्षीय बलाबल 
शिवसेना

  ६ पैकी ३ आमदार 
  पिंपरी-चिंचवडमध्ये ९ नगरसेवक 
  उरण, पनवेलमध्ये वर्चस्व 

राष्ट्रवादी काँग्रेस 
  एकमेव आमदार कर्जत 
  पिंपरी-चिंचवडमध्ये ३६ नगरसेवक
  शेतकरी कामगार पक्षाची साथ

२०१४ च्या निवडणुकीत मिळालेली मते 
शिवसेना (श्रीरंग बारणे) - ५ लाख १२ हजार २२६
लक्ष्मण जगताप (शेकाप- मनसे पाठिंबा) - ३ लाख ५४ हजार ८२९
राष्ट्रवादी काँग्रेस (संजय नार्वेकर) - १ लाख ८२ हजार २९३ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Maval Loksabha Shrirng Barne Parth Pawar Politics