Loksabha 2019 : सुरक्षित, गतिमान, आनंदी पुणे - मोहन जोशी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

‘सुरक्षित पुणे, गतिमान पुणे’, ‘हरित पुणे आणि आनंदी पुणे’ या पुण्याच्या विकासाच्या चतु:सूत्रीवर भर देणारा जाहीरनामा काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी मंगळवारी जाहीर केला. तुमच्या-आमच्या मनातील पुणे साकारण्यावर माझा भर राहील, असे आश्‍वासनही जोशी यांनी दिले.

पुणे - ‘सुरक्षित पुणे, गतिमान पुणे’, ‘हरित पुणे आणि आनंदी पुणे’ या पुण्याच्या विकासाच्या चतु:सूत्रीवर भर देणारा जाहीरनामा काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी मंगळवारी जाहीर केला. तुमच्या-आमच्या मनातील पुणे साकारण्यावर माझा भर राहील, असे आश्‍वासनही जोशी यांनी दिले.

महात्मा फुले वाड्यात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्वसामान्य नागरिकांच्या हस्ते या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. महिला, विद्यार्थ्यांसह पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरणावर भर देणाऱ्या या जाहीरनाम्यात प्रत्येक घरामधील एकाला नोकरी देण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. या वेळी विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे, दीप्ती चवधरी, प्रवीण गायकवाड, रवींद्र माळवदकर, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, डॉ. सतीश देसाई, वीरेंद्र किराड, अजित दरेकर यांच्यासह आघाडीतील मित्रपक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

समता भूमीतून उद्याच्या पुण्याचा भवितव्याचा वेध या जाहीरनाम्याच्या माध्यमातून घेण्यात आला आहे, असे जोशी यांनी सांगितले. पुणे शहर ज्या गतीने वाढते आहे, त्या पुण्याचा दर्जा वाढविणे, त्यांच्या विकासाची दिशा याच्याशी माझी बांधिलकी आहे. ती पूर्ण करताना सर्व घटकांचा विकास हा जाहीरनाम्याचा आत्मा आहे. सर्वसामान्य पुणेकरांच्या मनातील पुणे कसे असावे, याचा विचार करून तो तयार करण्यात आला असल्याचे जोशी यांनी सांगितले.

‘अंतिम टप्प्यातील प्रचाराला सुरवात झाली आहे. मला विश्‍वास आहे, की पुणेकर माझ्या पाठीशी उभे राहतील. माझा विजय निश्‍चित आहे. मी विजयी झाल्यानंतर जाहीरनाम्यात दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ती किती केली, यांची माहिती दरवर्षी वाड्यातून जनतेला देणार आहे,’’ असेही जोशी यांनी सांगितले. हा फेकूनामा नाही तर जी आश्‍वासने दिली आहेत, ती पूर्ण होतील, त्याचा काटोकाट प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Mohan Joshi Congress Declaration Politics