Loksabha 2019 : पार्थ पवार यांचा मावळात गावपातळीवर प्रचार सुरू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी सध्या घाटाखालील तालुक्‍यांमध्ये प्रचाराला प्राधान्य दिले असले तरी मावळ तालुक्‍यात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळत मतदारांशी संपर्क सुरू ठेवला आहे. गावभेटीबरोबरच घोंगडी बैठका, विविध समाज घटकांचे मेळावे, महिला मेळाव्यांद्वारे उमेदवारांची भूमिका पटवून दिली जात आहे.

वडगाव मावळ - मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी सध्या घाटाखालील तालुक्‍यांमध्ये प्रचाराला प्राधान्य दिले असले तरी मावळ तालुक्‍यात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळत मतदारांशी संपर्क सुरू ठेवला आहे. गावभेटीबरोबरच घोंगडी बैठका, विविध समाज घटकांचे मेळावे, महिला मेळाव्यांद्वारे उमेदवारांची भूमिका पटवून दिली जात आहे.

लोणावळ्यात महिला बचत गट मेळावा
लोणावळा - पार्थ यांच्या प्रचारासाठी येथे महिला बचत गट मेळाव्याचे आयोजन केले होते. संचेती लॉनमध्ये झालेल्या मेळाव्यात सुनेत्रा पवार यांनी मार्गदर्शन केले. सध्या महागाई वाढली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न प्रलंबित आहे.

बेरोजगारी वाढली आहे. लोकांच्या हाताला काम राहिले नाही. चुकीची माणसे निवडल्याने विकास रखडला आहे. खासदार व आमदार यांना जाब विचारण्याची गरज आहे. शरद पवार यांच्यामुळे महिलांना आदर, सन्मान, अधिकार व समान हक्क मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पार्थ यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, अर्चना घारे, बाळासाहेब पायगुडे, ॲड. विजय पाळेकर, बाळासाहेब नेवाळे, शहराध्यक्ष जीवन गायकवाड, मंजुश्री वाघ, पुष्पा भोकसे, संगीता गुजर, कुसूम काशीकर, राजश्री राऊत, सुवर्णा राऊत, संध्या खंडेलवाल, सुवर्णा अकोलकर, आरोही तळेगावकर, हेमलता काळोखे आदी उपस्थित होते. अनिता धायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. सिंधूताई कविश्‍वर यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Parth Pawar Maval Publicity Politics