Loksabha 2019 : पिंपरी शहरात मतदानासाठी पीएमपीच्या अडीचशे बस

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 April 2019

लोकसभा निवडणुकीसाठी चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी पीएमपीने अनुक्रमे ९३ आणि ७६ बस, तर भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी ८४ बस अशा एकूण २५३ बसची व्यवस्था केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

पिंपरी - लोकसभा निवडणुकीसाठी चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी पीएमपीने अनुक्रमे ९३ आणि ७६ बस, तर भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी ८४ बस अशा एकूण २५३ बसची व्यवस्था केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

संबंधित निवडणूक कार्यालयांमध्ये रविवारी (ता. २८) सकाळी आठच्या सुमारास पीएमपीच्या बस दाखल होतील. येथून निवडणूक कर्मचारी आणि साहित्य त्या त्या मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यात येईल. या व्यतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने या मतदारसंघांसाठी ५४ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी चिंचवडला १२, पिंपरीसाठी १५ तर भोसरीसाठी २७ जीप असतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Pimpri City 250 PMP Bus for Voting