Loksabha 2019 : सोशल मीडियावर आनंद, धाकधूक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 May 2019

पुन्हा एकहाती सत्ता मिळणार असल्याचे मतदानोत्तर कौल, अंदाज चाचणीतून जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. तसेच विरोधी पक्षांमध्ये धाकधूक आहे. याचे प्रतिबिंब सोशल मीडियावर उमटले आहे. युतीचे समर्थक विरोधकांची खिल्ली उडवत आहेत; तर विरोधकांकडून आजवरच्या जनमत चाचण्यांची उदाहरणे दिली जात आहेत.

पिंपरी - पुन्हा एकहाती सत्ता मिळणार असल्याचे मतदानोत्तर कौल, अंदाज चाचणीतून जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. तसेच विरोधी पक्षांमध्ये धाकधूक आहे. याचे प्रतिबिंब सोशल मीडियावर उमटले आहे. युतीचे समर्थक विरोधकांची खिल्ली उडवत आहेत; तर विरोधकांकडून आजवरच्या जनमत चाचण्यांची उदाहरणे दिली जात आहेत. 

सोशल मीडियावर काँग्रेसचेही अनेक ग्रुप आहेत. या ग्रुपवर आत्तापर्यंत जनमत चाचण्या कशा खोट्या ठरल्या, याची उदाहरणे दिली जात आहेत. याशिवाय ईव्हीएम मशिन बदलल्या जात असल्याचेही त्यात म्हटले आहे. किंबहुना विजय आपलाच होणार असल्याचा दिलासा कार्यकर्त्यांना दिला जात आहे.

जनमत चाचण्यांनंतर भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ते विरोधकांची खिल्ली उडविताना दिसत आहेत. निकालाच्या दिवशी विरोधकांनी टीव्हीसमोर बसताना रक्‍तदाब आणि डोकेदुखीची गोळी घेऊनच बसावे, असा सल्ला या पोस्टमधून देण्यात आला आहे.

‘कोणी काहीही म्हणा, पण गुलाल आमचाच’, ‘जनमत चाचणी काहीही म्हणो, पण झेंडा आमचाच फडकणार’, अशा गमतीशीर पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. राजकीय पक्षांची नावे टाळताना गुलाल आणि झेंड्याच्या व्यापाऱ्यांच्या नावाने या पोस्ट फिरत आहेत. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र पोलिसांच्या नावानेही पोस्ट व्हायरल झाली आहे. भरीस भर म्हणून की काय ‘निकालानंतर हुल्लडबाजी केल्यास मार आमचाच’, अशी पोस्ट महाराष्ट्र पोलिसांच्या नावे फिरत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Result Social Media Enjoy Tension