Loksabha 2019 : आढळरावांना जनता घरी पाठवणार - कोल्हे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

‘अभिनेता म्हणून माझ्यावर नानाविध प्रकारे टीका करताना खालच्या पातळीवर जाऊन तोंड उघडता. मात्र, जनतेच्या मूलभूत प्रश्नांसंदर्भात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील मात्र तोंड गप्प ठेवतात. विद्यमान खासदारांची हीच दुटप्पी भूमिका जनतेच्या लक्षात आली आहे.

गुनाट - ‘अभिनेता म्हणून माझ्यावर नानाविध प्रकारे टीका करताना खालच्या पातळीवर जाऊन तोंड उघडता. मात्र, जनतेच्या मूलभूत प्रश्नांसंदर्भात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील मात्र तोंड गप्प ठेवतात. विद्यमान खासदारांची हीच दुटप्पी भूमिका जनतेच्या लक्षात आली आहे. जनतेचा विश्वासघात करणाऱ्यांना या निवडणुकीत जनता नक्कीच घरी पाठवेल,’’ असा विश्‍वास शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. 

गुनाट (ता. शिरूर) येथे आयोजित सभेत डॉ. कोल्हे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘केवळ टीका करून कोणीही विजयी होत नसतो. देशाच्या राजकारणाचे विद्यापीठ मानले जाणाऱ्या शरद पवार यांच्यासारख्या बहुआयामी राजकीय व्यक्तिमत्त्वाचा मी उमेदवार आहे. त्यामुळे विरोधकांनी माझी चिंता करू नये.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Shivajirao Adhalrao Amol Kolhe Politics