Loksabha 2019 : पुण्यासह चार मतदारसंघांत ८६ लाखांहून अधिक मतदार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

पुण्यासह बारामती, शिरूर आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघांत अंतिम मतदार यादीनुसार एकूण मतदारांची संख्या ८६ लाख ५८ हजार २०१ इतकी झाली आहे. त्यात पुरुष मतदारांची संख्या ४५ लाख २५ हजार ४२४, तर महिला मतदारांची संख्या ४१ लाख ३२ हजार ५७८ इतकी आहे.

पुणे - पुण्यासह बारामती, शिरूर आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघांत अंतिम मतदार यादीनुसार एकूण मतदारांची संख्या ८६ लाख ५८ हजार २०१ इतकी झाली आहे. त्यात पुरुष मतदारांची संख्या ४५ लाख २५ हजार ४२४, तर महिला मतदारांची संख्या ४१ लाख ३२ हजार ५७८ इतकी आहे.

निवडणूक आयोगाकडून जिल्ह्यात चारही लोकसभा मतदारसंघात मतदार नावनोंदणीची मोहीम नुकतीच पार पडली. त्यात ३१ जानेवारी २०१९ अखेर मतदारांची संख्या ८४ लाख ४० हजार ६०७ होती. त्यानंतर दोन महिन्यांत राबविलेल्या मतदार नोंदणी मोहिमेनंतर ११ एप्रिल २०१९ अखेर त्यात दोन लाख १७ हजार ५९५ मतदारांची वाढ झाली आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Voter Constituency Politics