Loksabha 2019 : मावळ मतदारसंघात पावणेतीन लाख मतदारांची भर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

मावळ लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत दोन लाख ७३ हजार ८९२ मतदार वाढले आहेत. अंतिम मतदार यादीनुसार २२ लाख २७ हजार ६३३ मतदार हे उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहे.

पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत दोन लाख ७३ हजार ८९२ मतदार वाढले आहेत. अंतिम मतदार यादीनुसार २२ लाख २७ हजार ६३३ मतदार हे उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहे.

मावळ मतदारसंघात पुरुष - ११ लाख ६६ हजार २७२. महिला - १० लाख ६१ हजार ३२९ तर तृतीय पंथीय - ३२ मतदार आहेत. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण १९ लाख ५३ हजार ७४१ मतदार होते. त्यामध्ये पुरुष - १० लाख ३५ हजार ९६०. महिला - ९ लाख १७ हजार ७८१ इतके मतदार होते. एकूण मतदारांमध्ये गेल्या पाच वर्षांत दोन लाख ७३ हजार ८९२ मतदार वाढले आहेत. त्यात पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. एक लाख ४३ हजार ५४८ महिला व एक लाख ३० हजार ३१२ पुरुष मतदार वाढले आहेत. 

मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, चिंचवड, पिंपरी, मावळ, कर्जत आणि उरण असे सहा मतदारसंघ आहेत. अंतिम मतदार यादीनुसार, पनवेल हा सर्वाधिक म्हणजे पाच लाख १४ हजार ९०२ मतदारांचा विधानसभा मतदारसंघ ठरला आहे. तर, कर्जत हा सर्वांत कमी म्हणजे दोन लाख ७५ हजार ४८० मतदारांचा मतदारसंघ ठरला आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Voter Increase Maval Constituency