Loksabha 2019 : आज मतदार राजा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पुण्यात भाजप महायुतीचे उमेदवार गिरीश बापट, काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्यासह ३१ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार आहे. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, भाजप महायुतीच्या कांचन कुल यांच्यासह १८ उमेदवार आपले नशीब अजमावीत आहेत.

पुणे - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पुण्यात भाजप महायुतीचे उमेदवार गिरीश बापट, काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्यासह ३१ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार आहे. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, भाजप महायुतीच्या कांचन कुल यांच्यासह १८ उमेदवार आपले नशीब अजमावीत आहेत. यंदा प्रथमच ‘ईव्हीएम’ मशिनवर केलेले मतदान नेमके कोणाला दिले, याची चिठ्ठी मतदाराला ‘व्हीव्हीपॅट’ मशिनवर सात सेकंद पाहायला मिळणार आहे.

लोकशाहीचा उत्सव...
रायरेश्वर पठार (ता. भोर) - राज्यात लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या, बारामती मतदारसंघातील रायरेश्‍वर पठार मतदान केंद्र अवघड पायऱ्या व शिडीवरून साहित्य घेऊन कर्मचाऱ्यांनी सर केले. या केंद्रावर एकूण १६२ मतदार असून, त्यात ८२ पुरुष व ८० महिला आहेत.

‘सकाळ’चे आवाहन
लोकसभा निवडणुकीसाठी सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन सकाळ माध्यम समूह करत आहे. 

Web Title: Loksabha Election 2019 Voter King Voting Politics