Election Results : मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज ; 9.30 ला येणार पहिल्या फेरीचा निकाल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील खाद्य महामंडळाचे गोदाम आणि म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. बरोबर सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल.
 

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील खाद्य महामंडळाचे गोदाम आणि म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. बरोबर सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल.
 

 मतमोजणीसाठी सुमारे पाच हजार कर्मचारी, पोलिस आणि उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर हजर होत आहेत. टपाली मतदानाच्या पेट्या केंद्रांवर पोहोचल्या आहेत.जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चार जागांसाठी 93 उमेदवारांनी निवडणूक लढवली असून, मतमोजणी निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार अधिक गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, असे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले. 

पालकमंत्री गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, पार्थ पवार, अमोल कोल्हे, मोहन जोशी, कांचन कुल आदी दिग्गजांचा फैसला आज होत आहे. सकाळी 9.30 पर्यंत पहिल्या फेरीचा निकाल हाती येईल.
 

वेगवान.. अचूक आणि विश्वासार्ह निकालांसह सखोल विश्लेषण वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.esakal


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The result of the first round that will arrive at 9.30